अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार अॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती नंदुरबार जिल्ह्यातील कामांना स्थगिती दिल्याने. धडगाव अक्कलकुवा
तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे कामे रखडली होती या स्थगितीच्या विरोधात आमदार अॅड.के.सी. पाडवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत विकास कामांचा मार्ग मोकळा केला होता.
     आमदार पाडवी यांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे आमदार अॅड.के. सी. पाडवी उपस्थितीत धडगाव यांच्या तालुक्यातील शिरसाने,वावी, निगडी, गोरंबा या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत भूमिपूजन करण्यात आले.त्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते व पूल अंतर्गत देवाला वाघ देव मंदिर ते सीसीबारी पाटील पाडा रस्ता या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
     दरम्यान तलावडी रस्ता बांधकामाचे
भूमिपूजन करण्यात आले. आमदार पाडवी
यांच्या हस्ते धडगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे.कामांचा धडाका सुरू झाल्याने या भागातील रस्त्याच्या विकासाचा प्रश्न सुटणार आहे.
     या कार्यक्रमाला अॅड.गोवाल
पाडवी, माजी सभापती विजयाताई पावरा, जि.प.सदस्य रतन पाडवी निर्मलाताई राऊत,
जिल्हा परिषद सदस्य गीता ताई पाडवी, जाण्या पाडवी, विक्रम पाडवी, हरसिंग पावरा,
पावरा हेमा परडके, सुरेश पाडवी, पंचायत समिती सदस्य विलास पाडवी, सुखदेव पावरा, मायेचा गुरुजी, पोपटा वसावे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     भूमिपूजन कार्यक्रमानंतर परिसरातील नागरिकांनी कार्यकर्त्यांशी आमदार पाडवी यांनी संवाद साधत आपल्या भागाच्या विकासाला ब्रेक लावण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले होते व धडगाव अक्कलकुवा तू मतदारसंघातील कामांना कशाप्रकारे स्थगिती दिली होती आणि या स्थगितीच्या
विरोधात न्यायालयीन लढाई लढून या परिसराच्या विकासासाठी रोखलेला निधी
परत आणल्याचं  पाडवी यांनी सांगितले.
परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असून विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या तरी त्यावर मात करत या भागाचे रस्त्याचे प्रश्न सोडवण्याचं काम मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले यावेळेस उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *