उमरखेड प्रतिनिधी। उमरखेड तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन पिकांची नुकसान ही फार मोठया प्रमाणात झाली होती दीवाळी पूर्वी अनुदान जमा होणार अशी आशा होती मात्र अनुदान जमा झाले नाही खरीप हंगामात तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे तो कर्जबाजारी झाला आहे शासनाने जाहीर केलेली मदत आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही अतिवृष्टी मुळे नुकसान भरपाई अनुदान कधी मिळणार अशी आशा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान जमा करा मागणी आता राष्ट्रीय बंजारा परिषद तालुका अध्यक्ष लखन जाधव मागणी करत आहे