आरक्षणाच्या मागणीसाठी जालना शहरात शुक्रवारी (ता. एक) मनोज जरांगे यांची जाहीर सभा आणि जालना शहरात नऊ किलोमीटर भव्य रॅली झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाजबांधव या सभेला उपस्थित होते. विशेष म्हणजे दुपारची सभा सायंकाळी साडेसहा ते सात वाजता सुरू झाली. मात्र, तरी देखील एकही समाजबांधव सभा स्थळावरून उठला नाही. विशेष म्हणजे महिला आणि लहान मुलेही सहा ते सात तास एका जागेवर बसून होते.
जालना जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पाणी पाणी बॉटल, जागोजागी नाष्टयाची सोय केली होती.
मराठा आरक्षणाची मागणी अनेक केली जात आहे. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी जालना शहरातून लाखोंचे मोर्चेही निघाले आहेत. मात्र, मध्यंतरीच्या काळात मराठा आरक्षणाचा विषय काही अंशी थंड झाला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. या बेमुदत उपोषणादरम्यान ता. एक सप्टेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली, त्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांचे यांनी पहिल्या टप्प्यात ता. २९ ऑगस्ट ते ता.१४ सप्टेंबरपर्यंत बेमुदत उपोषण केले. तर दुसऱ्या टप्प्यात ता. २५ ऑक्टोबर ते ता.तीन नोव्हेंबर दरम्यान
पुन्हा बेमुदत उपोषण केले. दुसऱ्या टप्यातील बेमुदत उपोषण संपल्यानंतर चौथ्या टप्यातील राज्याच्या दौऱ्याची सुरवात जरांगे यांनी जालन्यातून केली आहे.
शुक्रवारी (ता. एक) जालना शहरात दुपारी जरांगेंची रॅली काढण्यात आली. यावेळी संपूर्ण जालना शहरात भगवे वादळ पसरले होते. शिवाय सभास्थळी लाखोंनी मराठा समाज बांधव एकवटला होता. विशेष म्हणजे दुपारची सभा सायंकाळी साडेसहा ते सात वाजता सुरू झाली. दिवसभर डोक्यावर उन्हें आणि सायंकाळी थंडी असतानाही मराठा समाजबांधव पांजरपोळ मैदानावर तब्बल सहा ते सात तास बसून होते. यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा वादळाच्या शांततेचे दर्शन जालनेकरांना झाले.
या वेळी मनोज जरांगे म्हणाले
नारायण कुचे ने आमचा गेम करायचा नाही,
निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकला जातय ,
नारायण कुचेना मी चांगलं म्हणत होतो,
सरकारला हात जोडून विनंती आमच्यावर अन्याय करू नका,