हडपसर : अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण ही होणार आहे. त्यामुळे हे महादेवा मला मंत्री करा. सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, असे शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी थेट महादेवालाच साकडे घातले आहे.
पुणे शहरात हडपसर हांडेवाडी रोड भर चौकात शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे, या शिल्पाचे भूमीपूजन माजी खासदार आढळराव पाटील शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरतशेठ गोगावले
माजी खासदार शिवाजीराव आढळरावपाटील यांच्या प्रयत्नातून आज प्रभू श्रीरामाच्या शिल्पाचे भूमिपूजन झाले आहे. येत्या दीड महिन्यात येथील काम होणार आहे. या कामात विरोधकांमधील अनेक जण आडवे आले. मात्र. आम्ही गडबडलो नाही. जर कोणी अडचणी निर्माण करेल त्यांना आडवा केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. असे शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी सांगितले आहे.
इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात भर चौकामध्ये प्रभू श्रीरामाची पूर्णाकृती पुतळ्याची होत आहे. यासाठी प्रमोद भानगिरे खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे जनतेने आता भानगिरे यांच्यावर मताच्या आशीर्वाद द्यावा, आणि मला येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आशीर्वाद द्यावा, असे बोलून शिरूर मतदार संघासाठी इच्छुक असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवले. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांनी मागील दोनच दिवसापूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहील असे संकेत दिले होते. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघाचाचा उमेदवार कोण ” असेल यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
हडपसर हांडेवाडी रोड भर चौकात शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्या पुढाकारातून प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती याच्या भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी इच्छा व्यक्त केली.