नागपूर : भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपच्या नेत्यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी या निवडणुकीतील विजयासंदर्भात संवाद साधला. भाजपला तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींच्या नेतृत्वात लोकसभेला ४०० जागा निवडून येतील : लोणीकर
भाजप नेते यांनी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना येतो एक झाकी है देश अभी बाकी है असं म्हटलं. तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर जालन्यात लोणीकरांकडून जल्लोष करण्यात आला. राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत आल्याने जालन्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह समर्थकांनी ढोल वाजवत एकमेकांना पेढे भरत जल्लोष केला आहे. मोदीजींची जगभरात विश्वगुरू म्हणून प्रतिमा आहे. येणाऱ्या लोकसभेला भाजपच्या ४०० जागा निवडून येतील, असा दावा यावेळी लोणीकर यांनी केलाय.
Users Today : 18