नागपूर : ऐन थंडीत आलेल्या अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मौदा आणि पारशिवनी तालुक्यातील धान पिकाला मोठा फटका बसला. कापसाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २ हजार २४८ शेतकरी यामुळे बाधित झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आल
नागपूरसह विदर्भात दोन दिवस आलेल्या पावसामुळे कापूस, धान, संत्रा, तूर, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यात मौदा आणि पारशिवणी तालुक्याला अधिक फटका बसला. या दोन तालक्यांतील १३१ गावांमधील पिकांचे नुकसान झाले. मौदा तालुक्यातील १ हजार ८५२ हेक्टरवरील धान आणि पारशिवनी तालुक्यातील ७८ हेक्टरवरील धान पीक मातीमोल झाले. मौद्यातील २ हजार १५० शेतकरी आणि पारशिवनीतील ९८ शेतकरी बाधित झाले आहेत. हा प्राथमिक अंदाज असला तरी गाव पातळीवर तलाठी, कृषी सहायक, समुपदेशक, तहसीलदार यांच्या माध्यमातून पंचनाम्याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. पंचनाम्याला गती मिळाली असून लवकरच हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्य शासनाला पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.