कोवाड-कामेवाडी रस्त्यासाठी
मुख्यमंत्री सडकमधून मंजुरी
आमदार राजेश पाटील : लवकरच कामाला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ३ : कोवाड ते कामेवाडी रस्त्याच्या बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर मुख्यमंत्री सडक योजना भाग दोनमधून मंजुरी मिळाली आहे. बांधकामाची ऑडर्रही निघाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली. दरम्यान, यामुळे आंदोलनाच्या फेऱ्यात अडकलेल्या कामेवाडी रस्त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोवाडपासून आठ ते दहा किमी. अंतराचा कामेवाडी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत होता. यासाठी विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. परिसरातील नागरिक व प्रवाशांनी रस्त्याच्या बांधकामाची मागणी लावून धरली होती. दोन दिवसांपूर्वी कोवाड, दुंडगे, कामेवाडी, चिंचणे येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार पाटील यांची भेट घेऊन रस्त्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री सडक योजना भागमधून रस्त्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले. लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात होणार असल्याचे सांगितल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. प्रत्यक्ष कामाला मंजुरी मिळाल्याने आंदोलनाच्या फेऱ्यात अडकलेल्या रस्त्याची तब्बल चार वर्षांनी सुटका झाल्याची चर्चा रंगली आहे. सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने रस्त्याच्या कामाचा वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन बांधकाम सुरू करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
कोवाड ते कामेवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडकमधून मंजूरी : आमदार राजेश पाटील
0
9
3
7
8
0
Users Today : 18
Leave a comment