शिरुर शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असलेल्या ऐतिहासिक संविधान स्तंभाचे पाबळ फाट्यावर दारूच्या दुकानासमोर स्थलांतरन ला तातडीने स्थगिती देणे देण्यात यावी अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी आणि भीम छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली.
“भारतीय स्वातंत्र्याची २५ वर्षे पूर्ण होण्याप्रीत्यर्थ राष्ट्राच्या वतीने भारत सरकार द्वारा १५ ऑगस्ट १९७२ ते १४ ऑगस्ट १९७३ या कालावधीत शिरूर शहरात मुख्य ठिकाणी संविधान स्तंभ स्थापित करण्यात आले आहे.
शिरूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणून या संविधान स्तंभाचा गौरव केला जातो.
आज रोजी प्र.जि.मा. 92 किमी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पुर्ण झाले असतानाही नगरपरिषदे द्वारा संविधान स्तंभ पाबळ फाट्यावर दारूच्या दुकानासमोर स्थलांतर करण्याचे नेमके प्रयोजन काय हे स्पष्ट होत नाही.
पाबळ फाट्यावर ज्या ठिकाणी संविधान स्तंभाचे स्थलांतर होणार आहे त्याठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर तीन चार दारूच्या दुकाने आहेत त्यामुळे भविष्यात दारू पिण्याऱ्या व्यक्तीकडून महान संविधानाची विटंबना होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
ही बाब अतिशय चिंताजनक आहे, तसेच शिरूर शहरवासीयांसाठी संविधान स्तंभ हा एक गौरवशाली वारसा आहे. त्यामुळे शहरवासियांच्या भावना या स्तंभासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे या स्तंभाचे संवर्धन व जतन करने हे आपल्या नगरपरिषदेचे आद्यकर्तव्य आहे.
या संविधान स्तंभाची प्रतिष्ठा जपण्यासाठी व एका ऐतिहासिक घटनेचा साक्ष असलेल्या या संविधान स्तंभाचे स्थलांतर करण्याच्या कामाला त्वरीत थांबवण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टी आणि भीम छावा संघटनेचे वतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
या वेळी बहुजन मुक्ती पार्टी चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद, शिरूर शहर अध्यक्ष समाधान लोंढे, शहर सचिव सागर घोलप, शहर संघटक अशोक गुळादे, भीम छावा चे प्रकाश डंबाळे, बहुजन समाज पार्टी चे रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते हैदर भाई, विलास देठे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान स्तंभाला हात लावला तर याद राखा… गाठ आमच्याशी – बहुजन मुक्ती पार्टी शिरूर
0
9
3
7
8
0
Users Today : 18
Leave a comment