देवेंद्र सिरसाट.(खोजमास्ट) नागपूर.
:- नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि 11डिसेंबर 2023ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार.जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी म्हणून दि 26 नोव्हेंबर2023ला जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचितराव सयाम यांच्या नेतृत्वात आमदार निवासस्थान या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्य पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.बैठकीला ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मडावी,जनसेवा गोंडवाना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष प्रा.धिरज सेडमाके,विदर्भ संघटक शांताराम सलाम,चंद्रपूर गडचिरोली लोकसभा अध्यक्ष बंडु मडावी,वर्धा अमरावती लोकसभा अध्यक्ष राजू बसवंत, नागपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष रमण बनकर , प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकित सामूहिक नेतृत्वात मोर्चा निघेल असे जाहीर करण्यात आले.त्या मध्ये एसी, ओबीसी, व आदिवासी समाजातील सर्व सन्माननीय व्यक्ती, नेते,व सर्व संघटनांचे पदाधिकारी हे या मोर्चाचे नेतृत्व करतील.जन आक्रोश मोर्चात ऐकून 38 मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात येणार आहे.त्या मध्ये मुख्य मागणी म्हणून 1)आदिवासी (अनुसूचित जमाती)होण्यासाठी निकष पूर्ण करू न शकणाऱ्या जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये (2)अधीसंख्य पदावरील क्रर्मचार्यांना दिलेले सरंक्षण त्वरीत रद्द करा (3) मा.सर्वोच्य न्यायालयानी दिनांक 6जुलै 2017रोजी गेर आदिवासी विरोधात दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी करून अधिसंख्य झालेल्या 12500पदावर खऱ्या आदिवासीची नोकर भरती करावी (4) नोकरीतील आदिवासींचा अनुशेष भरण्यात यावा (5) वनहक्क कायदा अधिनियम 2005-2006ची त्वरीत अमलबजावणी करावी (6) पेसा कायदा अधिनियम2014ची योग्य अमलबजावणी करावी (7) ओबीसी ची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी व अश्या प्रकारे 38 मागण्या घेऊन जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा विधान भवनांवर धडकणार आहे.मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्चात खऱ्या आदीवासी बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा गोंडवाना पार्टी तर्फ़े करण्यात येत आहे.
नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा देवेंद्र सिरसाट
0
9
3
7
8
0
Users Today : 18
Leave a comment