सोनाळी : गाडेगोंडवाडीच्या (ता. करवीर) उपसरपंचपदी हर्षा राहुल मेटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच केराबाई वरुटे होत्या.
येथे स्थानिक आघाडीची सत्ता असून समझोत्यानुसार उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या जागेवर हर्षा मेटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती दतात्रय मुळीक, विवेक मिठारी, बाबासाहेब मिठारी, प्रतीक मुळीक, संग्राम मेटील, सायली मेटील, दगडू मेटील, विशाल यादव, रंगराव मेटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक एम. बी. तिवले आदी उपस्थित होते.
Users Today : 19