उपसा वाढला, पातळीत घट

Khozmaster
2 Min Read

कळंबा : अनियमित पाऊस आणि बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावाचे पात्र कोरडे पडत आहे. पाणीपातळी २४ फुटांवर पोहोचली असून आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.

काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तलावातील पाणी उपसा त्वरित बंद करून कळंबासाठी पाणीसाठा राखीव ठेवावा; अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.सध्या तलावातून दैनंदिन ९ एमएलडीपेक्षा जास्त पाणीउपसा होत आहे. त्यामुळे पातळी चार फुटांनी कमी झाली आहे. पूर्व पश्चिम व दक्षिण बाजूचे पात्र कोरडे पडत आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे शहरासह उपनगरांना मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने महापालिकेने तलावातील पाणीउपसा बंद करून साठा राखीव ठेवावा, अशी मागणी होत आहे. लोकसंख्या २० हजारांपुढे गेल्याने पाणीपुरवठ्यावर ताण येत आहे. यंदा अनियमित पावसाने तलावात मर्यादित पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान यंदाही टंचाईग्रस्त यादीत कळंबाचा समावेश केल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र दहा वर्षांमध्ये पाणीटंचाईवेळी पाणीपुरवठ्याबाबत कोणतीच उपाययोजना होत नाही.

कळंब्यातील पाण्याला तवंग

तलाव परिसरामधील हॉटेल व्यवसाय नागरी वस्ती यामधील सांडपाणी तलावात सरळ ओढ्या नाल्याद्वारे मिसळत आहे. तसेच तलावात पाळीव जनावरे धुणे धुतले जात आहे त्यामुळे तलावाला प्रदूषणाचा विळखा घट्ट होत चालला असून केमिकलयुक्त तवंग पसरला आहे.

कळंबा तलावातून गावाला वर्षभर शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने तलावातील पाणीउपसा तत्काळ बंद करावा. यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांना ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देऊ.

– सुमन गुरव, सरपंच

काळम्मावाडी धरणातून शहरासह उपनगराला मुबलक पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने कळंबा तलावातील पाणी उपसा त्वरित बंद करून गावासाठी हा पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *