गांधी शास्त्री जयंती
आगळे रेशमी बंध
दुग्ध शर्करा सुयोग
द्विगुणीत हो आनंद
अंगीकारु वाचनाचा
महा पुरुषांचा छंद
जाहीर उत्सव यंदा
नाही कडक निर्बंध
वाचू समग्र साहित्य
लाभेआगळा आनंद
जयंती साजरी घरी
दरवळे विचार सुगंध
पगडा अंध श्रद्धेचा
दूर होतील निर्बंध
बुध्दी सफल समृद्ध
जाई जळमट दुर्गंध
परिवारासहीत वाचू
सुद्रुढ सकल संबंध
वाचन मनन चिंतन
मन कक्षा होती रूंद
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
Users Today : 22