वारणानगरमध्ये आज मॅरेथॉन
वारणानगर, ता. १ : येथील वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहातर्फे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त तात्यासाहेब कोरे सद्भावना दौड, वारणा बझार व तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी पुरस्कृत वारणा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ५ डिसेंबरला केले आहे. वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी ही माहिती दिली. स्पर्धा सकाळी ७.३० वाजता सुरू होतील. नऊ गटातील स्पर्धेत अनुक्रमे पाच विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. पुरुष खुल्या गटातील २१ व १० किलोमीटर, महिला खुल्या गटातील ५ किलोमीटर, महाविद्यालयीन पुरुष ५ किलोमीटर, मुले- आठवी ते दहावी – ३ किलोमीटर, मुले – पाचवी ते सातवी- २ किलोमीटर, मुली – दहावीपर्यंत – २ किलोमीटर, मुली पाचवीपर्यंत – १ किलोमीटर, मुले – चौथीपर्यंत -१ किलोमीटर अशी स्पर्धा होणार आहे. यात सहभागाचे आवाहन प्रा. के. जी. जाधव यांनी केले आहे.
वारणानगरमध्ये आज मॅरेथॉन
0
9
3
7
8
1
Users Today : 19
Leave a comment