४ हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून उपराजधानीत सुरवात होणार आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेसह मोर्चा आणि नेत्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकरा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. विशेष म्हणजे, यंदा आठ राज्य राखीव दलाच्या कंपनी आणि एक हजार होमगार्डचा समावेश करण्यात आला आहे.
अधिवेशनाच्या निमित्त्याने शहरात राज्याचे मंत्रिमंडळ आणि विविध राजकीय नेत्यांची वर्दळ असते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेसह मोर्चा आणि इतर विभागांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पाच हजार तर बाहेरील राज्यातील सहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बाहेरच्या अधिकाऱ्यांमध्ये दहा पोलिस आयुक्त, ५० सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरूष पोलिस निरीक्षक आणि २० महिला पोलिस निरीक्षक, अशा एकूण ९५ पोलिस निरीक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वांना मंगळवारी (ता.५) रिपोर्टिंग करावयाचे आहे. याशिवाय गोपनिय शाखा, डीबी पथक, ३० बॉम्बशोध व नाशक पथके, डॉग स्क्वॉड आणि विविध पथकांचा समावेश आहे.
स्मार्ट आणि हायटेक
■ हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपराजधानीत अकरा हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल होणार आहेत. कडेकोट बंदोबस्तासाठी नागपूर पोलिस सज्ज आहेत. कमांडोंना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’ असेल. पोलिस अधिकारी ‘व्हॉट्स अॅप’ आणि अन्य माध्यमातून एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत.
आयुक्तांकडून आढावा
अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस आयुक्तांनी आज सकाळपासून बैठकाचा सपाटा लावून आढावा घेतला. यावेळी विविध ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था आणि पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली
Users Today : 22