नागपूरचे अधिवेनशन ठरणार ‘पावसाळी’! विदर्भावर चक्रीवादळाचे सावट, ‘या’ दिवशी पावसाची शक्यता

Khozmaster
2 Min Read

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने दणका दिल्यानंतरविदर्भावर पुन्हा एकदा पावसाचे सावट दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मंगळवारनंतर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

त्यामुळे नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन पावसाळी ठरण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ‘मिचौंग’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून, येत्या एक ते दोन दिवसांत ते उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे.

त्याच्या प्रभावामुळे मंगळवारनंतर विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा व आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. पाऊस व ढगाळ वातावरण दोन-तीन दिवस राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या काळात काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अवकाळीचे हे संभाव्य संकट विदर्भातील शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.एका संकटातून सावरत नाही तोच दुसरे संकट मानगुटीवर उभे ठाकल्याने बळीराजाची चिंता निश्चितच वाढणार आहे. कारण पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती आहे. पावसाचा सर्वाधिक फटका संत्रा, मोसंबी, कापूस, तूर, पालेभाज्या, फळे इत्यादी पिकांना बसण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

२० नंतरच कडाक्याची थंडी

यंदा अर्धा हिवाळा संपूनही अद्याप विदर्भात कडाक्याची थंडी पडलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गारठ्याअभावी पारादेखील १०च्या खाली आला नाही. मात्र २० तारखेनंतर पारा घसरून थंडीचा कडाका वाढणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न ठरावे वादळी

■ यंदा पावसाने सुरवातीला दडी मारल्याने व नंतर धो-धो बरसल्याने बळीराजाला आधी कोरड्या व नंतर ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. आजच सरकारने नागपूर जिल्ह्यातील ११ महसुली मंडळात दुष्काळ घोषित केला. तात्काळ मदत मिळावी ही अपेक्षा शेतकन्यांना आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि त्यांचे प्रश्न वादळी ठरावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

‘मिचग’ चक्रीवादळ येत असले तरी, या वादळाचा विदर्भाला खूप मोठ्याप्रमाणावर फटका बसण्याची शक्यता कमीच आहे. केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येच चक्रीवादळाचा थोडाफार प्रभाव जाणवणार आहे. येत्या काही दिवसांत वादळ पूर्वोत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता असून हळूहळू कमजोर पडणार आहे –मोहनलाल साहू, संचालक, प्रादेशिक हवामान विभाग (Latest Marathi News)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *