आरोग्य सेविकेवर प्राणघातक हल्ला! आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Khozmaster
1 Min Read

तई बुज येथील आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानी झोपली असताना आरोग्य सेविकेला अनोळखी व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची रविवारी घटना घडली. या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या घटनेनंतर आरोग्य कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले. घटनेची पोलिसांत तक्रार केली असून, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तई बुज. उपकेंद्रात आरोग्य सेविका माधुरी काफ्कर २०१४ पासून निरंतर सेवा देत आहेत. रविवारी (ता. तीन) सकाळी त्या उपकेंद्रातील निवासस्थानी झोपल्या असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या निवासस्थानात जावून काठीने जबर मारहाण केली.

त्यानंतर अनोळखी व्यक्तीने त्यांचा मुलगा व आईलासुद्धा मारहाण करत शिवीगाळ केली. यात आरोग्य सेविका गंभीर जखमी झाली आहे. या गंभीर घटनेची माहिती होताच आरोग्य कर्मचारी वर्गाकडून याचा निषेध करण्यात आला. या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोषीवर कारवाई करून त्याला शिक्षा देण्याची मागणी आरोग्य सेविकेने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैकाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बन्सोड आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेची भेट घेवून धीर दिला. त्यांच्या कुटुंबीयांवर औषधोपचार करण्यात आला. तई येथील सरपंच श्रीहरी भेंडारकर यांनी गावात सुरक्षा व शांतता ठेवण्यासाठी विनंती केली आहे.(Latest Marathi News )

0 9 3 7 8 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *