सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेतकऱ्यांची शेतात बांधावर जाऊन नुकसानीची केली पाहणी
जामनेर तालुक्यात अचानक सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या वादळी वारा व मुसळधार पाऊस झाल्यामुळे येत्या काही दिवसांत काढणीला आलेल्या कपाशी , केळी पिकांचे आदी नुकसान झाले आहे.जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, वडगाव आदी गावांना या अवकाळी पावसाचा जास्त फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी नुकसानीची पाहणी केली.नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला जाईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशी मी ग्वाही देतो असे जामनेर तहशिलदार नानासाहेब आगळे बोलत होते.