सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही पी राजपूत यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. आरोग्य केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल राठोड यांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित, दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना उपयुक्त अशी राज्यघटना लिहिली. खूप अभ्यास पूर्वक कलमे लिहिली. ते दिवसांतून 18 ते 20 तास अभ्यास करत होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसारच आपल्या देशाचा कारभार चालतो. आपल्याला मतदानाचा अधिकार राज्यघटनेमुळे मिळाला आहे. त्यांनी अस्पृश्यता, सती प्रथा, अंधश्रद्धा इत्यादी वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी काम केले.
दलितांना पाणी मिळवून देण्यासाठी चवदार तळे महाड येथे सत्याग्रह केला. दलितांना आपले हक्क व अधिकार मिळवून दिले. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यूदिवस आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतो. अशा शब्दांत नॅशनल मराठी शाळेतील मुख्याध्यापक योगेश चोपडे यांनी मार्गदर्शन केले. लहानपणा पासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूप हुशार होते. त्यांचे वाचन चांगले होते. ते खूप शिकले एकदा वाचलेले ते विसरत नव्हते. आपण किमान त्यांच्यामधील एक तरी गुण घ्यावा व किमान दररोज एक तास तरी अभ्यास करावा, असे मनोगत शाळेचे शिक्षक भागवत गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ व्ही पी राजपूत, डॉ.राहुल चव्हाण, डॉ.विजय कटोले, उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मोहन सुरडकर,आरोग्य कर्मचारी अनिल महाजन, विकास मापारी,महादू सोमासे,कडुबा गोरे,शुभम खैर, स्वातीताई निकम, अर्चना जाधव, सोनाली राठोड,नेतल राठोड,उषा जाधव उपस्थित होते.