लोणार : संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात चर्चेत असलेली बुलडाणा डाँक्टर्स प्रीमियर लीग अर्थात बि डी पी एल क्रिकेट स्पर्धा यावर्षी लोणार डाँ असोसिएशन च्या वतीने लोणार क्रिकेट क्लब च्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले असून या स्पर्धेचा भव्य शुभारंभ 6डिसेंबर ला झाला , या उदघाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी असलेले डाँ अनिल गाभणे, डाँ पी ई पाटील,डाँ निलेश गट्टानी, डाँ के बि मापारी, आयोजन समिती चे अध्यक्ष गजानन सोसे यांच्या हस्ते शिवरायांच्या व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. यावर्षी या स्पर्धेचे 8वे पर्व असून या स्पर्धेत जिल्हा भरातील डाँक्टर्स चे 19संघ सहभागी होत असून ही स्पर्धा 17डिसेंबर पर्यंत सुरु असणार असल्यामुळे जिल्हा भरातून क्रिकेट प्रेमी मोठया उत्सहात या ठिकाणी हजेरी लावून क्रिकेट चा आनंद घेणार आहेत लोणार डाँ असोसिएशन व लॅब असोसिएशन च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या साठी उच्च दर्जाची पीच व उत्कृष्ट मैदान मेहकर रोडवर तयार करण्यात आले असून या स्पर्धेचे यु ट्यूब चॅनल वर प्रक्षेपण करण्यात येत असून लोणार सारख्या ग्रामीण भागात प्रथमच एवढी भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, या स्पर्धेसाठी लोणार डाँ असोसिएशन ची टीम व सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत त्यांच्या या अप्रतिम आयोजनाचे उदघाटक डाँ अनिल गाभणे यांनी कौतुक केले तसेच अशा स्पर्धा खेळल्यामुळे डाँक्टरांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते असे प्रतिपादन लोणार डाँ असोसिएशन चे अध्यक्ष डाँ के बी मापारी यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाँ भास्कर मापारी यांनी केले तर आभार डाँ प्रदीप झोरे यांनी केले