पालघर :सौरभ कामडी खोडाळा:- शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष एक दिवशीय विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन खोडाळा येथे करण्यात आले होते
वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन जिल्हा परिषद पालघर यांनी शिबिराचे आयोजन केले होते
या कार्यक्रमाला 1500 रुग्णांनी उपस्थिती लावली सर्व आजारांवर मोफत उपचार व तपासणी करण्यात आली डोळे तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले आलेल्या सर्व रुग्णांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाने हे शिबिर घेण्यात आले यात प्रमुख उपस्थिती
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी लावली होती तसेच पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम शिवसेना ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम शिवसेना तालुकाप्रमुख अमोल पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चतर शरद पाटील जिल्हाप्रमुख निक्की नाईक मोखाडा सभापती भास्कर थेतले उपसभापती प्रदीप वाघ पंचायत समिती सदस्य युवराज गिरंधले निलेश झुगरे वासुदेव खंदारे विक्रमगड विधानसभा सचिव देविदास काकड अल्पसंख्याक तालुका संघटक शाहरुख मणियार युवा शहर प्रमुख अमोल जाधव समाजसेवक नितीन तामोरे संतोष मासरे,खोडाळा ग्रामपंचायत सरपंच कविता पाटील,प्रभाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील,उमाकांत हमरे व सर्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स व कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 3