शेती साहित्य, कापूस, ऑईल व मोटार सायकल चोरी करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या जेरबंद, एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 8 क्विंटल कापूस, 270 लीटर ऑईल, 1 मोटारसायकल व 7 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत, 4 गुन्ह्यांची उकल.!!

Khozmaster
6 Min Read
नंदुरबार -: मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच शेतकरी बांधव स्वत: देखील त्यांना भेटत होते. नंदुरबार पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नव्हते. पोलीसांसमोर देखील घडलेले गुन्हे उघडकीस चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत गुन्हे बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्यंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
दिनांक 04 नोव्हेंबर 2023 रोजी  पोलीस अधीक्षक नंदुरबार पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील धामडोद येथील शेतातील पाण्याची मोटर चोरी करणारे हे भागसरी ता.जि. नंदुरबार येथील आहेत.
  चोरी केलेल्या पाण्याच्या मोटरी त्यांनी शेतांमध्ये लपवून ठेवलेल्या असल्याची बातमी मिळाल्याने  पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  निलेश गायकवाड यांना कळवून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भागसरी गावात जावून संशयीत आरोपीतांची माहिती काढून  रंजित अमर भिल ( 35) श्रीनाथ सुकलाल भिल  (26) सागर रविंद्र भिल (22)  कृष्णा प्रल्हाद भिल (26) सर्व रा. भागसरी ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेतले.
  ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांना धामडोद येथील शेतातून चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटरबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे देवू लागले म्हणून पथकाने संशयीत इसमांना विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातून 98 हजार रुपये किमतीच्या 07 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
   त्याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं 350/2023 भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे दाखल आहे.
तसेच  शेख शकील शेख युसुफ कुरैशी यांचे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खामगांव शिवारातील शेतातील घराचे कुलुप तोडून 56 हजार रुपये किमतीचा कापुस चोरुन नेला म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं 377/2023 भा.द.वि. कलम 454,457,380 प्रमाणे दिनांक 02 डिसेंबर 2023 रोजी दाखल आहे.
   सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  नितेश प्रविण ठाकरे (22) रा. खामगांव ता.जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरची चोरी त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केली असल्याची माहिती दिल्याने मच्छींद्र अनिल भिल (22) राहुल विनोद पाडवी सर्व रा. खामगांव ता.जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 56 हजार रुपये किमतीचा 08 क्विंटल कापुस हस्तगत करण्यात आला आहे.
   ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या बातमीच्या आधारे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील तलवाडे खुर्द गावाचे शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवर मधून 300 लीटर ऑईलचोरीच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे  गोपाल कैलास राजपुत (27) रा. तलवाडे खुर्द ता.जि. नंदुरबार.
  मोतीलाल लक्ष्मण माळी (22) रा. इंद्राहटटी् ता.जि. नंदुरबार.
  रोहित प्रभाकर धनगर (20 ) रा. तलवाडे खुर्द ता.जि. नंदुरबार यांना देखील ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुझलॉन टॉवर मधून चोरी केलेले 26 हजार 460 रुपये किमतीचे 270 लीटर ऑईल जप्त करण्यात आले असून आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच शहादा पोलीस ठाणे गु.र.नं 270/2023 भा.दं.वि. कलम 379 मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातून 20 हजार रुपये किमतीची एक मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेली असून अल्पवयीन मुलास पुढील चौकशीकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शेती साहित्य, कापूस, ऑईल व  मोटार सायकल चोरी करणारे वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण 10 आरोपी व एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे 7 क्विंटल कापूस, 270 लीटर ऑईल, 1 मोटार सायकल व 7 इलेक्ट्रीक मोटर हस्तगत करुन  4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक नंदुरबार पी.आर.पाटील सांगितले.
 ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे, नंदुरबार  उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार तालुका  पोलीस निरीक्षक  निलेश गायकवाड,  पोलीस निरीक्षक  दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक  हेमंत मोहिते, प्रतीक भिंगारदिवे, पो. ह. मोतीराम बागुल, गुलाब तेले, पोलीस नाईक बापु बागुल, विशाल नागरे, सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे, रमेश साळुंखे, एकनाथ ठाकरे, सरवरसिंग वसावे, पोलीस अंमलदार शोएब शेख, अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, सचिन सैंदाणे यांनी केली आहे.
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *