मालेगांव येथे मनोज जरांगे यांचे भव्य स्वागत O सकल मराठा समाजाच्या वतिने महीला भगीनींनी केले औक्षण

Khozmaster
2 Min Read
सैय्यद इमरान
मालेगाव प्रतिनिधी.
   मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मालेगाव शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी भव्य स्वागत करण्यात आले. येथील गोयनका नगरात मराठा कृषी सेवा केंद्राच्या समोर उभारलेल्या भव्य स्टेजवर महिला भगिनीं सह गरजवंत मराठ्यांनी त्यांचा भव्य हार घालून सत्कार केला.
     मनोज जरांगे पाटील पातुर वरून काटा येथे जात असताना मालेगाव शहरातील गोयनका नगर मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली होती . त्यासाठी हजारो लोक जमले होते. मनोज जरांगे साधारण तीन वाजताच्या सुमारास मालेगाव येथे आले असता प्रचंड फटाक्यांच्या आतिशबाजी करण्यात आली . जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ जय शिवराय, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही , आदी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर येथील मराठा कृषी सेवा केंद्रा समोर ओपन स्पेस मधे उभारलेल्या भव्य स्टेजवर सकल मराठा समाजाच्या वतीने महिला भगिनींनी तिलक लावून त्यांना ओवाळण्यात आले . नंतर भव्य फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो मराठा बांधव तथा भगिनी उपस्थित होत्या . त्यावेळेस त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी कोणतीही जाहीर सभा न घेता त्यांनी लगेच काटा या ठिकाणी जाण्यासाठी प्रयाण केले. यावेळी सकल मराठा समाजाचे अॅड शंकरराव मगर, प्राचार्य वसंतराव अवचार, प्रा भरत आव्हाळे, प्रा अनंत गायकवाड, जगन्नाथ रंजवे ,बाबुराव सदार, अनिल गवळी, तेजराव जाधव ,विश्वनाथ शिंदे, कृष्णा गायकवाड भास्कर गुडदे तसेच विशाल सदार , विकी सदार व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले .यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या चहाची व फराळ – पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. शिवमती कामिनी अवचार, संध्याताई आव्हाळे, गीता रंजवे, उषा सदार, विद्या पाटील, रंजना मगर ,विभाताई वाझुळकर , नीता भोयर, छाया जाधव ,वाळूकरताई, शितल साखरे, कल्पना कढणे, विद्युलता गायकवाड, शारदा कावरखे, निमा पळसकर आदी महिला भगिनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
0 9 3 8 1 5
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *