तीन राज्यातील विजयानंतर भाजपाचा मालेगांवात जल्लोष* सेमी फायनल जिंकली, फायनल जिंकण्याचा विश्वास

KHOZ MASTER
2 Min Read
सैय्यद इमरान
मालेगांव प्रतिनिधी
मालेगांव : लोकसभेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीने चित्र स्पष्ट केले. जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे, हे समोर आले. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांनी ‘लोकसभेचा मार्ग’ दाखविला. देशातील राजकीय नकाशावर भाजपा मोठ्या ताकदीने पुढे आली, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. विवेक माने यांनी दिली. त्याचबरोबर देशाला मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असा विश्वासही दर्शविला.
देशातील चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यापैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर आहे. तर, तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. देशाला विश्वगुरू करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन सातत्याने देशहितासाठी प्रयत्न करीत असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा देशातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले घवघवीत यश आहे.
पंतप्रधान मोदी यांचा विकासाचा मंत्र देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेने स्वीकारला आहे. कल्याणकारी योजना, आरोग्याची काळजी आणि लोकांच्या मनातील विषयांना हात घालून सुरू असलेल्या वाटचालीचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया डॉ. माने यांनी तीन राज्यांतील विजयाच्या निकालानंतर दिली. विजयात पक्ष संघटनेच्या प्रत्येक कार्यकत्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, असे समर्पित कार्यकर्ते या विजयाचे वाटेकरी आहेत.
 दरम्यान मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे शहरातील जुने बस स्थानकावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ,फटाक्याची आतिषबाजी करून आनंदउत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. विजय उत्सवात डॉ. माने सह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. तीनही राज्यात मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचे यश असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गजानन नवघरे, शहर अध्यक्ष संतोष तिखे, डॉ पवन मानधने, संतोष दे घुगे, अनिल सोळंके, राजू सांगळे, सुनील शर्मा, किशोर महाकाळ, डॉ महेश घुगे रिधोरकर, संदीप पिपंळकर, विनोद बाणाईतकर, चेतन काबरा, शेख मुदशीर , राहुल गायकवाड अहेमद खान, शेख युसूफ भाई, सुमित देवकते, अभिषेक आढाव, ऋषभ बाजड, गणेश कुटे, संजय केकण, मुना मुंदडा आदी भाजपा कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 7 1 5 2
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *