सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी पारूबाई देवराम दरेकर यांची बिनविरोध निवड

Khozmaster
2 Min Read

शिरूर  – सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी पारूबाई देवराम दरेकर यांची बिनविरोध निवड तसेच काँग्रेसचे वैभव तात्या  यादव यांची व्हाईस चेअरमन पदी मारली बाजी…..! सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये पहिल्यांदाच महिलेला चेअरमन पदाचा मान ! सणसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी पहिल्यांदा महिलाराज या संस्थेवर आज पारूबाई देवराम दरेकर यांची बिनविरोध चेअरमन पदी नियुक्ती झाली तसेच वैभव तात्या यादव यांची व्हॉइस चेअरमन पदी निवड झाली, त्याचप्रमाणे तज्ञ संचालक म्हणून ज्येष्ठ नागरिक विनायक दादा भाऊ हरगुडे धडाडीचे कार्यकर्ते हनुमंत नानाभाऊ हरगुडे यांची तज्ञ संचालक पदी नियुक्त झाली. निवडणूक अधिकारी म्हणून वाळून साहेब यांनी कामकाज पाहिले या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मोनिकाताई हरगुडे मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे गावचे सरपंच सुवर्णाताई दरेकर माजी सरपंच शिवाजी दरेकर माजी उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे राहुल मच्छिंद्र दरेकर माजी चेअरमन पांडुरंग हरगुडे सोसायटीचे विद्यमान संचालक अजित दरेकर बाळासाहेब दरेकर सुरेश हरगुडे देविदास दरेकर राम हरी हरगुडे भैरू सेठ पंडितराव हारगुडे गणेश कानडे, काळुबाई देवराम हरगुडे काळुराम दरेकर राजेंद्र दरेकर सुरेश शेठ दरेकर शिवसेनेचे अमोल पुंडलिक हरगुडे माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव हरगुडे एडवोकेट गणेश दरेकर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे यांनी सर्वांना ठरल्याप्रमाणे पदे देत असताना सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली माझी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

0 9 3 8 2 0
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *