सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालिंका देवी शिक्षण संस्था संचलित छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व सजीव श्रीमती रत्नाबाई नारायण कोलते व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते याप्रसंगी बोधिसत्व, ज्ञानाचा महासागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक नारायण रायभान कोलते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन गाथेवर प्रकाश टाकला संघर्षातून व गरिबीतूनच माणसाला आयुष्याची व शिक्षणाची प्रचिती होते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यामध्ये केवळ गरिबी व दारिद्र्य या गोष्टीवर रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर व जिद्दीवर क्षणाच्या माध्यमातून लढायचं हे बाळकडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला पाजले अस्पृश्यता निर्मूलन शिका संघटित व्हा संघर्ष करा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य डोक्यात ठेवून मी भारताची राज्यघटना तयार केली असे ठामपणे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी काय केले हे शब्दात सांगता येणार नाही संकटांना आयुष्यात घाबरायचं नसतं ज्ञानी माणसाच्या आयुष्यातच येतात व त्या संकटावर मात करून आपली प्रगती साधायची असते भारताला दिला तुम्ही आयुष्यात चांगले कर्म करा, भविष्यात मोठे व्हाल तरी या समाजाकडून तुम्हाला त्रास होणारच कारण त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही कारण त्यांना प्रगती मागील संघर्ष दिसत नाही आपल्या वेळी आपल्या पुस्तकांच्या व आपल्या वाणीच्या माध्यमातून त्यांनी जगाला अनमोल संदेश दिला अशाप्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यावेळेस शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर बंधू उपस्थित होते विकास पाटील, विजयसिंग राजपूत, संजय जोशी, मुकुंदा व्यहारे, सुदाम राठोड, भास्कर खमाट, भास्कर ससाणे, भूषण देसले, पोपटराव सोनवणे, पंजाबराव शेळके, गणेश मोहने, दीपक शिसोदे, योगेश शेळके, राहुल बडक, योगेश थोटे,अजाबराव चव्हाण,श्याम जाधव, बाबासाहेब कोलते,व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते