देऊळगाव राजा (जिल्हा- बुलडाणा) तालुका शिवसेना पदाधिकारी बैठक तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा

Khozmaster
2 Min Read

शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार देऊळगाव राजा तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक  शिवसेना संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच  जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत, विधानसभा संपर्क प्रमुख श्री अनुप कुमार गवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ७/१२/२०२३ रोजी पंकज लॉन, देऊळगाव राजा जि. बुलडाणा येथे संपन्न झाली.
याप्रसंगी व्यासपीठावर म आ जिल्हा संघटिका सौ जिजाताई राठोड, जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे, तालुका प्रमुख श्री दादाराव खार्डे, श्री लखन गाडेकर, श्री महेन्द्र पाटील ता,प्र,सिं,राजा, श्री किसन धोंडगे त्,प्रमुख चिखली., मा नगराध्यक्ष श्री गोविंदराव झोरे, मा, नगरसेवक श्री वसंतआप्पा खुळे, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख  श्री गिरीश वाघमारे, यु से ता प्रमुख प्रा श्री सिद्धेश्वर आंधळे, श्री नितेश देशमुख ग्रा,पं,उपसरपंच, मा पं स सदस्य श्री भगवानराव खंडारे,  दे,मही शहर प्रमुख श्री भरत शिंगणे, सर श्री गजानन घुगे सरपंच दगडवाडी., श्री मोहन खांडेभराड उप शहर प्रमुख.दे,राजा., श्री राजीव नागरे ग्रा पं,सदस्य,मनोज भुतेकर (सचालक कृ,उ,बा,समिती चिखली. यांची उपस्थिती होती.
आगामी काळातील पक्षाची रणनीती, पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ प्रमुखांचे कार्य, बि एल ए यांच्या नियुक्त्या या संदर्भात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा मान्यवरांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या.
या बैठकीला देऊळगाव राजा तालुक्यातील शिवसेनेचे (उ बा ठा) शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, आजी माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *