शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहराचीही लोकसंख्या मोठी आहे.रुग्णांना वेळेत व चांगले उपचार शहरातच मिळण्यासाठी येथे १०० खाटांचे सर्व सोयीसुविधांनीयुक्त असे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

Khozmaster
1 Min Read

शिरूर प्रतिनिधी

  शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शहरात सर्व शासकीय कार्यालय आहेत.त्याचबरोबर येथे ग्रामीण रुग्णालयात असून या रुग्णालयात शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातुन तसेच शहरालगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा,पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातुन व शिरूर तालुक्यात रांजणगाव व कारेगावला मोठी औद्योगिक वसाहत असल्याने आणि शहराचीही लोकसंख्या मोठी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण ग्रामीण भागातून येतात.मात्र ग्रामीण रुग्णालय पाहिजेत तेवढ्या सुविधा पुरवण्यात सक्षम नसल्याने अनेक रुग्णांना पुणे किंवा इतरत्र जावे लागते.त्यात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना वेळेत उपचार मिळवण्यासाठी मोठी ससेहोलपट सहन करत आर्थिक झळ सोसावी लागते.

ग्रामीण रुग्णालयात गंभीर आजाराचे, अपघातग्रस्त रुग्ण नियमित येतात. लोकसंख्येच्या प्रमाणात येथील ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सोईसुविधा आहेत. उपजिल्हा रुग्णालयात  स्थानिक पातळीवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया, सिझर,एम.आर.आय,सिटी स्कॅन,क्ष किरण, सोनोग्राफी,डोळ्यांचे ऑपरेशन,लहान बालकांचे रोगनिदान तथा मागदर्शन व इतर आजारांवर उपचार मिळु शकतात.त्यामुळे शिरूर शहराची मोठी लोकसंख्या, औद्योगिक वसाहत असल्याने येथील मोठ्या प्रमाणात असणारा कामगार वर्ग,शेजारील तालुक्यातुन उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच शिरूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *