मुंबई
Indian Premier League स्पर्धेतील ५६व्या सामन्यात Gujarat Titans विरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर Sunrisers Hyderabad संघाचा कर्णधार Pat Cummins याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा दणका दिला आहे. स्लो ओव्हर रेट नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कमिन्सवर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला ८२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या ८६ धावांवर गारद झाला.
स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई
सामन्यानंतर BCCI ने पॅट कमिन्सवर आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत कारवाई केली. स्लो ओव्हर रेट उल्लंघनाची ही त्याची यंदाच्या हंगामातील पहिलीच घटना असल्याने त्याच्यावर किमान १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
यंदाच्या आयपीएल हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे दंडित होणारा कमिन्स हा एकमेव कर्णधार नसून यापूर्वीही अनेक कर्णधारांवर अशी कारवाई झाली आहे.
अनेक कर्णधार आधीच दंडित
यंदाच्या हंगामात Shreyas Iyer, Shubman Gill, Ajinkya Rahane, Hardik Pandya, Ruturaj Gaikwad आणि Axar Patel यांसारख्या कर्णधारांनाही स्लो ओव्हर रेट उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले आहे.
प्लेऑफचे गणित अजूनही जिवंत
या पराभवानंतरही सनरायझर्स हैदराबादचे प्लेऑफचे आव्हान संपलेले नाही. संघाला १६ गुणांच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे.
हैदराबादचे पुढील सामने १८ मे रोजी Chennai Super Kings विरुद्ध आणि २२ मे रोजी Royal Challengers Bengaluru विरुद्ध होणार आहेत. त्यामुळे आगामी सामने संघासाठी ‘करो या मरो’ स्वरूपाचे ठरणार आहेत.
Users Today : 16