माझं खोटं वाटत असेल तर वरिष्ठांना बोलवा… आमदार अपात्रता सुनावणीत दिलीप लांडेंचा दावा

Khozmaster
1 Min Read

नागपूर : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या सुनावणीत महाविकास आघाडीला सुरुवातीपासून विरोध केल्याचे स्पष्ट केल्याची माहिती दिली.
आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करत निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासंदर्भात मुंबईत सुनावणीला सुरुवात झाली होती. हीच सुनावणी आता हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात सुरू झाली.

नागपुरात गुरुवारी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची सुनावणी झाली. यात उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून २०१९ ते २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री असताना विरोध का केला नाही, असे विचारण्यात आले. यावर लांडे यांनी, शिंदे यांच्याकडे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ नका, अशी मागणी केली होती, अशी माहिती दिली.यावेळी शिंदे यांनीही भाजपशी पुन्हा एकदा युती करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितल्याचे लांडे यांनी सांगितले. यावर यासंदर्भात रेकॉर्डवर काहीही दिलेले नाही, असा प्रतिप्रश्न वकिलांकडून करण्यात आला. त्यावर ही माहिती खोटी असल्यास पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बोलावून विचारता येऊ शकेल, असे लांडे म्हणाले. आज, शुक्रवारी यावर पुन्हा सुनावणी होईल.
0 9 3 8 2 4
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *