Nagpur : पुरवणी मागण्यांवर पाटील यांचा आक्षेप,चर्चेनंतरच मागण्या मंजूर कराव्यात

Khozmaster
1 Min Read

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सभागृहात ठेवल्या. पुरवणी मागण्यांवर शेकाप आमदार जयंत पाटील यांनी ‘बजेट’ पेक्षा पुरवणी मागण्या जास्त असतात, असा आक्षेप नोंदविला.

पुरवणी मागण्यांवर संमती देताना सदस्यांना बोलू द्यावे, पुरवणी मागण्यांवर सविस्तर चर्चा व्हावी, शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. यावेळी पाटील म्हणाले, त्यांनी सभागृहाला सांगितले की, पूर्वी पुरवणी मागण्यांवर चर्चा होत होती आणि सूचना मांडल्या जात होत्या, त्या सूचना स्वीकारल्या जात होत्या. त्यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, २०१८ पासून लेखी उत्तर येणे बंद झाले आहे. लेखी उत्तर येणे सुरू झाले तर सदस्यांना मदत होईल अशी सूचना त्यांनी यावेळी सरकारला केली.विधान परिषद सदस्य राजेश राठोड यांनी सभागृहाला सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून मला धमक्या येत आहेत, टँकर अंगावर चढवण्यात आला, गाडी फोडण्यात आली. म्हणून गत अधिवेशनात आपण संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याबाबत आदेश काढण्यात आले नाही. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा पुरविण्यात संदर्भात तत्काळ सूचना देवू अद्याप आदेश का दिले गेले नाही? असा सवाल राठोड यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती घेण्यात येईल, असे सभागृहाला सांगितले.

0 9 3 8 2 7
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *