प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी)- कुढावद ता.शहादा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रघुवंशी यांनी ग्राम विकासासाठी लोकप्रतिनिधींनी योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना लाभ देण्याचे आवाहन केले.
शहादा तालुक्यातील कुडावद ग्रामपंचायतीची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया देखील घेण्यात आली होती. उपसरपंच पदाची माळ चुनीलाल पाटील यांच्या गळ्यात पडली. शुक्रवारी आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नवनियुक्त उपसरपंच चुनीलाल पाटील, सदस्य संजय आलमा,प्रदीप चव्हाण व माजी सरपंच कायसिंग वाघे, माजी उपसरपंच अशोक पाटील यांच्या सत्कार केला. ग्रामपंचायत ग्रामविकासाच्या महत्त्वाच्या पाया आहे.
पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांच्या लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना येत असतात अशा योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवाव्यात असे माजी आमदार रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल पटेल उपस्थित होते.
Users Today : 22