कोल्हापूर प्रकरण आता मुख्यमंत्री दालनात. : अधिवेशनांमधून हालचालीस सुरुवात.. पुजा चौगुले आत्मदहन प्रकरणी शासन अलर्ट.

Khozmaster
5 Min Read
कार्यालय  , प्रतिनिधी -कोल्हापूर परिक्षेत्रातील गौणखणीज माफिया प्रकरण आता नागपूर अधिवेशनात चांगले गाजले असून याबाबत गंभीर  दखल घेण्याचे संकेत दिसून येत आहेत..
               सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, सात डिसेंबर रोजी सौ पूजा चौगुले यांनी  माईन माफिया प्रकरणी चौदाशे कोटी रुपयांचा दंड वसूल करा अथवा अधिवेशन दरम्यान विधानभवनासमोर अकरा डिसेंबर रोजी आत्महत्या करणार असा गंभीर इशारा दिल्यामुळे शासन सतर्क झाले आहे. अधिवेशनात  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हालचालींना तीव्र वेग आला असून कोल्हापूर परिक्षेत्रातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांना  अधिवेशनादरम्यान आपला लेखाजोखा घेऊन बोलावण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणातील सत्य शासनासमक्ष उघडकरणेअशा प्रकारच्या हालचालीला वेग आल्यामुळे वापरपरिक्षेत्रातील वन अधिकारी तसेच गौण खनिज अधिकारी यांच्या पायाखालची भुई सरकारला वेळ लागणार नाही. त्यात अशातच सौ .पूजा चौगुले यांनी दिलेल्या आत्महत्या इशाऱ्यामुळे अधिवेशनात याची दाहकता मंत्रालयापर्यंत निश्चित पोहोचेल. …
         शासनाच्या चौदाशे कोटी रुपयांच्या वसुलीसाठी एका महिलेचा हा लढा शासन हिताचा जरी असला तरी शासन त्याला शासनमात्र कवडीमोल किंमत देत आहे.
        भ्रष्ट अधिकारी, पुढारी आणि माईन माफीयांना अभय देऊन शासनाचा तसेच वन जमिनीचा होत असलेला र्हास हा कधी काळात भरून निघणार नाही .कदाचित शासन याबाबतीत अनभिज्ञ असावे अथवा डोळे मिटून अंध असल्यागत ची भूमिका घेत असावे..
                 खोज मास्टर पोल -खोल पुढच्या भागात आपण बघूया नागपूर अधिवेशनात पूजा चौगुले यांच्या आत्मदहन प्रकरणी  दाहकता वाढणार अथवा हे आंदोलन सुद्धा दडपले जाणार याची उत्तम इतंभूत स्पॉट पंचनामा तसेच लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी खोज… मास्टर न्यूज चैनल ला लाईक
सबस्क्राईब आणि शेअर करा
याबाबत अशा प्रकारची मालिका पुढे सुरू राहणार..  महाराष्ट्रातील माईन माफीयाच्या विरोधात असलेल्या महिलेच्या लढाईला जनतेपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे.. जनहितार्थ महिलेच्या या लढाईत  महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेने तसेच महिलांनी  प्रत्यक्ष सहभाग घेऊन पूजा चौगुले यांना सपोर्ट करावा. असे आवाहन चौगुले यांच्याकडून करण्यात आले आहे. प्रकरणातील  गांभीर्य चौकशी करण्याकरिता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे चौकशी समिती गठित करून संबंधित चौदाशे कोटी प्रकरणात लक्ष देणार अथवा कोल्हापूर मायनिंग अशाच प्रकारे सुरू राहून माफिया राज कोल्हापूर परिसरात दहशत निर्माण करत राहणार.
 पूर्वनपरिक्षेत्रातील 134 हेक्टर जमीन आगामी काळात मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन त्या ठिकाणी मोठमोठी खंदक निर्माण होणार अशी भयावया परिस्थिती निर्माण झाली असताना स्थानिक जिल्हा खाली कर्म अधिकारी आनंद पाटील आणि जी गुरुप्रसाद त्याचप्रमाणे माईन माफिया तेथील राजकीय पुढारी यांचे लागेबांधे प्रशासनाला भारी पडणार हे अधिवेशन काळातील महिलेचे आत्मदाह आंदोलन ठरवणार आहे.
           याप्रकरणी सदर महिलेच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात लेखी दस्तावेज सादर करण्यात आले आहे.
 चौकट घेणे
दिनांक 22/ 6 /23 रोजी करवीर तहसीलदार यांच्याकडून पंचधारा महिला सोसायटीला एक पत्र लागू करण्यात आले त्यामध्ये असा संदर्भ होता की शिवाजी आनंदा पोवार त्या तक्रारीच्या अनुषंगाने धारा महिला खान मजूर संस्था यांच्याकडून 490 तर हद्दीमध्ये अवैध उत्खनन झाले असल्याचे पत्र देण्यात आले आहे ‌. त्याच अनुषंगाने दंडात्मक कारवाई करून पंचधारा महिला संस्थेला 22 कोटी रुपयांचा दंडात्मक कारवाई ठेवण्यात आली आहे. सणाचा आधार असून या कारवाई संदर्भात आम्ही रीतसर अपील केलेली आहे. शासनाचा आदेश पालन करणे ईतरांप्रमाणे माझे सुद्धा कर्तव्य आहे. परंतु माझा एक प्रश्न आहे शिवाजी आनंदा पवार च्या तक्रारीवरून शासनाने माझ्यावर कारवाई केली त्याच शिवाजी पवार नी तेवीस रोजी शिवाजी आनंदा पवार अध्यक्ष वडार समाज मी व्हिडिओ करून सदर 45000 ब्रास उत्खनन हे अरविंद दिलीप पाटील यांनी केलेले आहे. च्या आशयाचे एफेडिवीट असताना  अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई कशी केली. एकाच माणसाचे दोन जबाब असताना त्या माणसावर कारवाई करण्याऐवजी पंचधारा महिला संस्थेवर कारवाई कशी करण्यात आली. अशाप्रकारे दुतर्फा लिखित बयान देणाऱ्या व्यक्तीवर 420 ची अंतर्गत कारवाई करण्यात यावी. बाबतीत सखोल चौकशी करून एक समिती नेमण्यात यावी. समिती माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अंतर्गत कामगिरी चोख पार पाडेल, या सर्व प्रकारातील गोड बंगाल बाहेर काढेल त्याचप्रमाणे शासनाच्या चौदाशे कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा रखडलेलं काम  मार्गस्थ होईल न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही सूडबुद्धीने या अधिकाऱ्यांनी हे फिरवलेले शरेन्द्र आहे या संदर्भात पंचवधारा महिला संस्थेचा कोणताही दोष नाही.
0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *