Thursday, July 25, 2024

आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?

बीड: अंबाजोगाईमध्ये मोंढा रोडवर एका तरुणाचा फिल्मी स्टाईलने मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ च्या सुमारास मुढा रोडवर राजेंद्र श्रीराम कळसे (३७, महसूल कॉलनी अंबाजोगाई) हे काहीतरी कामासाठी या भागात आले होते. तिथेच अज्ञात हल्लेखोरांनी अचानक जवळ येत त्यांच्याशी हुज्जत घालत वाद सुरू केला. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादात चक्क हाणामारी सुरू झाली. यामध्येच हल्लेखोरांनी चक्क वर्दळीच्या ठिकाणी दगड आणि लाकडी दांड्याने राजेंद्र यांच्यावर हल्ला चढवत मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र कळसे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नेमकं हा वाद काय होता कशामुळे ही बाचाबाची झाली आणि त्यात कोणत्या अज्ञात व्यक्तींनी हा राजेंद्रवर हल्ला चढवला हे अजूनही अज्ञात आहे.मात्र या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. हत्येचे नेमकं कारण काय याता तपास पोलीस करत आहेत. मात्र घटनेची माहिती कळताच अंबाजोगाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाचा पंचनामा करून शव रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास तत्पर पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. या हत्या प्रकरणात नेमकं कोणतं गुढ समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मात्र या घटनेनंतर अंबाजोगाई शहरात पूर्ण खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप मारेकरी कोण आहेत? याचा तपास पोलीस प्रशासन घेत आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang