सलग तिसऱ्यांदा भाजपा तालुकाध्यक्ष व विधानसभा प्रमुख पदी बिनविरोध निवड चंद्रकांत अण्णा बाविस्कर यांचा जाहीर सत्कार

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.
जामनेर येथील सुप्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघाचे विद्यमान सभापती चंद्रकांत आण्णा बाविस्कर यांचा समाजाशी असलेला  निष्पक्षपातीपणा व राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या माध्यमातून  सर्वांशी जवळीक करून नामदार गिरीष महाजन यांचें खंदे व एकनिष्ठ समर्थक चंद्रकांत अण्णा बाविस्कर यांची सलग जामनेर तालुकावर तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष व जामनेर विधानसभा प्रमुख कधी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल सर्व सामाजिक  राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला त्याचेच उचित साधून शैक्षणिक क्षेत्रातून जाहीर सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले तेव्हा छत्रपती संभाजी नगर जिल्हा व जळगाव जिल्हा खाजगी संस्थाचालक आघाडीच्या वतीने जीवन कोलते जय कालिंका देवी शिक्षण संस्था सावळदबारा सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांचे मार्गदर्शक व नेहमी संकटात साथ देणारे मित्रवर्य जामनेर शेतकरी संघाचे संचालक मादणी येथील प्रसिद्ध व्यापारी  नितीन जी पाटील, फत्तेपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रवीण इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीचें मालक रमेशजी सरोदे व प्रसिद्ध सिद्धेश्वर कृषी केंद्र व फर्टीलायझर संचालक गोपाल जी शेळके यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी चंद्रकांत अण्णा बाविस्कर यांनी आपल्या सर्व विजयाचे श्रेय व कामाची पावती केवळ त्याचे मार्गदर्शक व आधारस्तंभ नामदार गिरीश महाजन यांना दिले व पक्षाने  जबाबदारी मला दिलेली आहे ती जबाबदारी मी उत्कृष्टपणे पार पाडेल व येणाऱ्या काळामध्ये परत भारतीय जनता पार्टीचा झेंडा जामनेर तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यावर सुद्धा आम्ही फडकवणारच असे बोलून या जाहीर सत्काराबद्दल आभार मानले याप्रसंगी जामनेर तालुक्यातील अनेक आजी-माजी ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक सरपंच व पत्रकार बंधू उपस्थित होते.
0 9 3 8 3 5
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *