नेहरू युवा केंद्र वाशिम व यूनिसेफ यांच्या कडून श्री.शिवाजी हासस्कूलच्या २४२ विद्यार्थ्यांची अनिमिया – सिकल्सेल तपासणी “नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा यांच्या पुढाकार”

Khozmaster
3 Min Read
वाशिम प्रतिनिधी  /  वाशिम ; नेहरू युवा केंद्र वाशिम व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र, व गोवा राज्य आणि युनिसेफ यांनी  पारित केलेल्या अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण माता बाल संगोपन व शालेय आरोग्य  कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य  आरोग्य अधिकारी जि.प व जिल्हा शल्य चिकित्सक जि.सा रू. यांनी पारित केलेल्या पत्रानुसार नेहरू युवा केंद्र वाशिम व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तशय तपासणी कार्यक्रमाचे आयोजन हे नेहरू युवा बहुउद्देश्यमंडळ केकतउमरा यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. 7  डिसेंबर 2023 रोजी वाशिम येथील श्री.शिवाजी हायस्कूल वाशिम येथे  चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उद्घाटन शिबिराला उपस्थित नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत श्री.शिवाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य अरुण सरनाईक, जिल्हा सामान्य रुग्णालय लॅब टेक्निशियन सोनल मिश्रा मॅडम, नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर, नॅशनल युथ पार्लमेंट सदस्य आकांक्षा गायकवाड, निती आयोग – संपर्क फाउंडेशन महेश हुळे ,   यांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अनिमिया   सिकलसेल – इन्चार्ज  सोनल मिश्रा यांनी  शरीरातील रक्ताचे/हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, यालाच ॲनिमिया/ रक्ताल्पता असे म्हणतात. केस गळणे, थकवा येणे, दम लागणे, वर्ण पांढुरका दिसणे, पाळीच्या विविध तक्रारी चालू होणे, पायाला गोळे येणे, चक्कर येणे, भूक मंदावणे, धडधड होणे इत्यादी अनेक लक्षणे ॲनिमियामध्ये दिसतात. अनेक कारणांमुळे ॲनिमिया होतो.
लाल रक्तपेशींतील बदलामुळे बालकाला शरीरातील वेगवेगळ्या भागात उत्पन्न होणाऱ्या जीवघेण्या वेदनांना सामोरे जावे लागते. शिवाय हिमोग्लोबिन कमी झाल्याने पंडूरोग (अॅनिमिया) निर्माण होतो. शरीराची वाढ खुंटते. अशा बालकांना संक्रमक रोग (इन्फेक्शन) लवकर होतात. नवजात शिशूमध्ये एक वेगळे हिमोग्लोबिन असते. त्याला एचबीएफ म्हणतात. हे तीन-चार महिन्यांनी बदलते व होते एचबीए (ए म्हणजे अॅडल्ट). सिकल रुग्णांमध्ये ते होते, एचबीएस (एस म्हणजे सिकल). एचबीएफ हे सिकल हिमोग्लोबिनमुळे होणारा त्रास कमी करते.
त्यामुळे लग्न पूर्वी सर्वांनी आपली सिकलसेल ऍनिमिया टेस्ट करून घेणे हे गरजेचे असते. आपण जर सिकलसेल ग्रस्त असलो तर  जेणेकरून होणारे आपत्य हे ग्रस्त होऊ शकते हेच सर्व रोखण्याकरिता आपण लग्नपूर्वी ॲनिमियाची टेस्ट करणे हे गरजेचे असते.देण्यात आली आहे.  या वेळी नेहरू युवा केंद्र वाशिम राष्ट्रीय स्वयंसेविका अर्चना मुंडे, प्रियंका इडोळे,दत्ता मोहळे,प्रदीप देवकर,अशांत कोकाटे,संदिप कांबळे, कल्याणी ढोले , स्नेहा खंडारे, पूजा  हरीमकर यांचे विशेष सहकार्य लाभले तर संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र गोवा राज्य प्रकाश  मनुरे युनिसेफ समन्वयक तानाजी पाटील,जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत व अनिल ढेंग यांच्या मार्गदर्शनात प्रदिप पट्टेबहादुर – अध्यक्ष नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा यांच्या वतीने करण्यात आले होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *