वाशिम:-(फुलचंद भगत)
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲप च्या माध्यमातून आज महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम चालु आहे. यामध्ये ओपन लिंक्स फाउंडेशन ही शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी, प्रशासनाचा वेळ वाचण्यासाठी आणि योग्य कामाची प्रशंसा व्हावी यासाठी ही संस्था आज प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांचे तालुका आणि जिल्हा स्तरीय विजेते ठरवत असते. ते विनोबा ॲप यावरील शिक्षकांनी केलेल्या ॲक्टिविटी वर हा पुरस्कार शिक्षकांना गट शिक्षणधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान केल्या जातो त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एका शिक्षिकेचा दि.१४ ऑक्टोंबर रोजी सत्कार करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद वाशीम व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲप च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिका व शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
सप्टेंबर (२०२४) महिन्याचे तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते जि.प.शाळा फाळेगाव येथील शिक्षिका अर्चना सरकटे यांना पं.स.मंगरुळपीरच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला गोंदेवर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सदरील पुरस्कार वितरणा वेळी गटशिक्षणाधिकारी,केंद्र प्रमुख नारायण दुबे,प्रभाकर मनवर,सुरेश राऊत तसेच ओपन लिंक फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक देवेश भोयर उपस्थित होते.गट शिक्षणाधिकारी यांनी विजेत्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन तालुक्यातील उपस्थित शिक्षकांना केले.