पोलीस कुणाच्या बापाचे नसतात…पहूर पो. स्टे. चे पो. निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या पोलीस टिमने पहूर शेंदुर्णी हद्दीत वाढविला खाकीचा धाक – खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस 12 तासात अटक , जिल्ह्यातील पहिली NPDA कारवाहीची प्रोसेस सुरु…

Khozmaster
4 Min Read
जामनेर प्रतिनिधी गोकुळ शसिंग राजपूत
शेंदुर्णी ता. जामनेर – जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग येरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब पहूर पोलीस स्टेशन व शेंदुर्णी औट पोस्ट हद्दीतील कायदे सुव्यवस्था व शांतता हिंदू मुस्लीम एकता जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी रात्र दिवस मेहनत घेतांना दिसत आहे. प्रत्येक गुन्ह्यात पोलिसांना यश मिळत असून उत्कृष्ठ कामगिरी पोलिसांची सुरु आहे , सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी शेंदुर्णी व मेणगाव येथील भादवी कलम 376 मधील आरोपीस एका दिवसात अटक करून गजाआड केले आहे तसेच भादवी कलम 307 मधील आरोपी तात्काळ पकडून जेल मध्ये टाकले आहे , काही आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत.    पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील साहेब दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात गुन्हेगाराला शिक्षा कशी होईल यासाठी सखोल तपास करून योग्य न्याय देण्याचे काम करतात. विशेष जळगाव जिल्ह्यातील पहिली NPDA कार्यवाही ची प्रोसेस पहूर पो. स्टे. चे सचिन सानप साहेब यांनी सुरु केली आहे .
पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब पहूर पो. स्टे. येथे येणे अगोदर पहूर व शेंदुर्णी हद्दीत खुलेआम चाकुहल्ले , HM दंगली इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत होते गुन्हेगारावर पोलिसांचा वचक राहिला नव्हता परंतु “पहूर व शेंदुर्णी हद्दीत खाकीचा धाक संपला” अशी बातमी व्हायरल होताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार साहेब यांनी दखल घेतली होती त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना पहूर पोलीस स्टेशन देण्यात आले आहे. सचिन सानप साहेब यांनी पदभार स्वीकारताच कामाची झलक दाखवून पोलीस अधिक्षक साहेब यांच्या विश्वासाला खरे उतरले तेव्हापासून पहूर व शेंदुर्णी येथे सर्व जाती धर्माच्या मिरवणुका सण उत्सव आषाढी एकादशी , गणपती , दुर्गाउत्सव , बकरीईद , रथ उत्सव यात्रा शांततेत उत्साहात पार पडले आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाही झाल्याने गुन्हेगारीची टक्केवारी कमी झालेली दिसत आहे , कोणतीही घटना किवा गुन्हा घडण्या अगोदर पोलिसांना माहिती मिळाल्यास त्यावर उपाययोजना करतांना दिसून येतात त्यामुळे अनेक मोठ्या घटना घडल्या नाही एखाद्या सर्व सामान्य माणसाने सानप साहेब यांना रात्री अपरात्री केव्हाही फोन केला तरी ते फोन उचलतात व तात्काळ मदत करतात असा अनुभव लोकांनी बोलून दाखविला आहे . सानप  साहेबांच्या कामातून खाकीचा धाक वाढला आहे लोकांना योग्य न्याय मिळत आहे अगोदर लोक पोलीस स्टेशनला जायला घाबरत होते पण आता पोलिसांच्या भरोशावर बिनधास्त जगत आहे. पोलीस अधिकारी उत्तमदादा पाटील तसेच सिंघम पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांच्या काळात गुन्हेगार पोलिसांना घाबरून पळून जात होते भांडण करत नव्हते . जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग येरुडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पो. स्टे. चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप साहेब , शेंदुर्णी औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील साहेब , सहा. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील साहेब , पो. हे. कॉ. प्रशांत विरणारे , पहूर पो. स्टे. चे गोपाल गायकवाड , ज्ञानेश्वर ढाकणे , जिजाबराव कोकणे , विजय पाटील, मनोज गुजर हे खाकी वर्दीतील माणसे 24 तास ड्यूटी करून आपले संरक्षण करतात पण कोणीही असे समजू नये की पोलिसांशी माझी ओळखी आहे ,साहेब माझ्या गावाकडचे आहे आपल्याला मदत करतील , पोलीस कुणाच्या बापाचे नसतात..कोणत्याही कार्यवाहीत राजकीय हस्तक्षेप नसल्याने  पोलीस कायद्याच्या कक्षेत राहून कारवाही करू शकले आहे .
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *