कोल्हापूर ः येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजित विभागीय शालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा आडसूळ. या वेळी मान्यवर उपस्थित होते.
विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू
कोल्हापूर, ता. १३ ः जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हा क्रीडाधिकारी नीलिमा आडगुळे यांच्या हस्ते झाले. शाहूपुरी जिमखाना मैदानावर तीन दिवस या स्पर्धा रंगणार आहेत. यात कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुलींच्या क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे क्रीडा शिक्षक सचिन पांडव, ‘सकाळ’च्या जाहिरात विभागाचे सहायक व्यवस्थापक आनंद शेळके, शाहूपुरी जिमखान्याचे मुख्य प्रशिक्षक दिवाकर पाटील, साई हायस्कूलचे प्राचार्य एस. पी. पाटील आदी उपस्थित होते.
Users Today : 51