जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात, विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला. गजानन तौरवर झालेल्या गोळीबारानंतर शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काल मंगळवारी त्यांच्यावर जालन्यातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभी राहायला जागा नसल्यामुळे अनेकांना भिंतीवर उभे राहून अंत्यदर्शन घ्यावे लागले.जुन्या वादातून भरदिवसा पिस्तुलाद्वारे चार गोळ्या झाडत करीत गजानन तौर याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. संशयित भागवत डोंगरे आणि गजानन तौर यांच्यात वाद होता. यावरूनच भागवत डोंगरे याने तौर याचा खून केल्याचे पोलिस सूत्रांची माहितीय. डोंगरे याने लक्ष्मण गोरे, टायगर, राहुल ताटीतामुलवार यांच्या मदतीने गजानन तौर याचा खून करण्याचा प्लॅन केला असल्याची महिती पोलीस सूत्रांनी दिलीय..जालना किंग को टपकाना एक ही सपना…
गजानन तौर याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे याने २६ ऑक्टोबर रोजी व्हाट्सअप स्टेटस लाईन वर ”जालना किंग टपकाना एक ही सपना”, अशा प्रकारचं वाक्य लिहिलेलं होतं. हे वाक्य गजानन तौर याच्या हत्येनंतर चर्चेत आलं आहे. हत्येच्या आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी त्यांनी शहरातील आझाद मैदान येथे अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन केले होते.
गुन्हेगारी ते सामाजिक कार्यकर्ता
गजानन तौर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे सर्वज्ञात आहेत. जिल्ह्यातील जालना शहर, घनसावंगी, अंबड या भागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. परंतु मध्यंतरी त्याने या गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवत सामाजिक कार्यात सहभाग वाढवला होता. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच सोमवारी पुन्हा एकदा गोळ्यांच्या आवाजाने जालना शहर हादरलं. मंठा चौफुली भागात गजानन तौर याची भर दिवसा म्हणजेच दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली.
दोघांना अटक एकावर उपचार सुरू
गजानन तौर हत्याप्रकरणी तौर याचा सहकारी मित्र माऊली उर्फ ज्ञानेश्वर मांगडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात हत्येसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. लक्ष्मण गोरे, रोहित नरेंद्र ताटी पामुलवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर संशयीत आरोपी भागवत डोंगरे याच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. तर पोलीस FIR नुसार टायगर (नाव माहिती नाही) हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.अंत्यविधीला पोलिसांचा बंदोबस्त
गजानन तौर याचे मोठ्या प्रमाणात समर्थक होते. त्यामुळे त्याच्या अंत्यविधीला हजारोंची गर्दी जमणार असल्याने पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशाल कॉर्नर ते बसस्थानकाकडे जाणाऱ्या भोकरदन नाका, रामतीर्थसह विविध ठिकाणी पॉइंट लावले होते. या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय एकत्रित आला होता.