भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित भव्य किल्ले बांधणी सह विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करीत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीवर स्वराज्य स्थापन केले. यासाठी त्यांना सर्वात जास्त मदत झाली ती किल्ल्यांची.
या बद्दल समाजात विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी तसेच मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा व सोशल मीडियामध्ये गुरफटलेली युवा पिढी पुन्हा आपल्या संस्कृतीत रममाण व्हावी यासाठी आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या स्पर्धेतुन तो हेतू साध्य होतोय याचा आनंद आहे.
Users Today : 14