शासन आपल्या दारी, शासकीय योजना घरोघरी.

Khozmaster
1 Min Read
शासन आपल्या दारी, शासकीय योजना घरोघरी या कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम गारगोटी, ता.भुदरगड येथे संपन्न झाला.
घर बांधणीसाठी पैसे कमी पडत असल्यामुळे डोंगरी भागातील लोकांच्यासाठी असलेल्या योजनेतून १० टक्के जादा मिळवून देणार असून 5 ब्रासच्या वाळूची रॉयल्टीही वाचणार असल्याचे सांगितले.
गोर-गरिबांना मदतीचा हात देण्यासाठी शासन विविध योजना हाती घेत आहे. या योजनांचा लाभ गावा-गावात प्रभावीपणे पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत गोरगरीब, विधवा, निराधारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मिळणारं समाधान हे वेगळेच असते.
तसेच तालुक्यातील दिव्यांगांना कोल्हापूर येथील सी.पी.आर.येथे तपासणीकरीता जाण्यासाठी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयातून प्रत्येक बुधवारी व गुरूवारी रुग्णवाहिकेची सेवा पुरविणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा सरचिटणीस नाथाजीराव पाटील, गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव, बाळूमामा ट्रस्टचे धैर्यशिल भोसले-सरकार, माजी सभापती सुनिलराव निंबाळकर, धनाजीराव देसाई (बापू), सरपंच मारुती भराडे, गारगोटी उपसरपंच सागर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोई, सदस्या रुपाली राऊत, स्मिता पिसे, किरण कल्याणकर, पायल पावले, शितल पाटील, अमोल दबडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 1 7 8
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *