नागभीड तालुक्यातील किरमीटी (मेंढा) येथे माना आदिम जमात मंडळाच्या वतीने आयोजित नागदिवाळी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम माँ माणिका देवीचे भक्तिमय वातावरणात दर्शन घेतले आणि उपस्थितांना विविध विषयांवर संबोधित करून मंगलमय शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आगमनाप्रसंगी समाजबांधवांनी वाजतगाजत मिरवणूक काढली व उपस्थित माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण केले आणि पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते भिमरावजी ठावरी, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, भाजपा चिमूर तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते जहांगीरभाई कुरेशी, भाजपा नेते बंडूभाऊ गेडाम, माजी नगरसेवक न.प. नागभीड संजय अमृतकर, माजी नगरसेवक न.प. नागभीड रुपेश गायकवाड, संजय मालोदे, दिनेश समर्थ, मनोहर चौधरी, संजय दडमल, दिलीप दडमल, राजकुमार दडमल, श्रीकृष्ण दडमल व अन्य मान्यवर आणि आदिवासी, माना समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 24