वैजापूरात विविध कार्यक्रमानी श्री दत्त जयंती उत्सव आनंदात संपन्न

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता२६
शहरतील विविध ठिकाणच्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती जन्म उत्सव  मंगळवार(ता,२६)रोजी आनंद व उत्साहात संपन्न झाला,श्री ,स्वामी समर्थ आध्यत्मिक व संस्कार केंद्रात गुरू चरित्र पारायण झाले व यातील चौथ्या अध्यातील श्री गुरूदत्त  जन्म वाचन  श्री ,अनर्थे व मोनिका गंडे यांनी केले,या नंतर आरती झाली व सर्वांना  प्रसाद प्रदान करण्यात आला, देशपांडे गल्ली श्री दत्त मंदिर, श्री शास्त्री नगर दत्त मंदिर, वैद्यनाथ मंदिर(मोठे महादेव मंदिर)ब्राह्मचारी मंदिर,आदर्श कॉलोनी मंदिर,भगगाव येथील दत्त मंदिर याठिकाणी ही या निमित्ताने,प्रवचन,कीर्तन,आरती,गुरू चरित्र पारायण,रामायण कथा,श्री दत्ताची मूर्ती पालखी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमानी श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव शहरातील सर्व दत्त मंदिरात उत्साहाने संपन्न झाला श्री स्वामी समर्थ केंद्रात माजी नगरसेवक लिमेश वाणी, सुरेश आलूले, सी,के,पवार,अरविंद तुपे,धोंडीरामसिंह राजपूत,प्रतीक्षा मोकळ ,सुमनबाई आलूले,दत्ता रोजेकर,काथवटे मामा, श्री ,निखाडे,श्री चव्हाण यांनी  या उत्सवात सहभाग नोंदविला,
(फोटो कॅप्शन-केंद्रात श्री दत्तात्रय  यांची पूजा व आरती करताना भक्त गण)
0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *