आज दिनांक २७ डिसेंबर रोजी नानाजी नगर, वडगांव येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या श्री दत्त क्रीडा व सांस्कृतिक केंद्र सुसज्ज अभ्यासिका इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. अभ्यासिका या सामुहिकरित्या ज्ञानवर्धन करण्याचे केंद्र आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा ती सामूहिकरित्या केली जाते तेव्हा त्यांचा लाभ हा परिणामारक आणि सर्वसमावेशक होत असतो.अभ्यासिकेत देखील असेच सामुहिक ज्ञानवर्धनाचे काम होईल. असा मला विश्वास आहे. या कार्यक्रमाला प्रभागाचे माजी नगरसेवक श्री प्रदिप (पप्पु) देशमुख , हरिचंद्र येरगुडे, विनोद निखाडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Users Today : 37