सोयगाव तालुक्यात अंगणवाडी बंदमुळे विविध समस्यांसह चिमुकले पोषक आहारापासून वंचित कर्मचारी मानधन वाढीसाठी शासन झाले उदासीन

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील व राज्यभरात अंगणवाडी सेविकांनी/मदतनिसानी आपल्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून बेम दत बंद पुकारला आहे. आज बंदला २२ दिवस पूर्ण होत आहेत तरीही मागण्यांबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येत नाही. शासस्तरावरून याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी
देखील मागण्या मान्य होईपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतल्यामुळे अंगणवाडीत येणारे चिमुकले मात्र पोषण आहारापासून वंचितच राहीले आहेत.शासनामार्फत तालुक्यात सोयगाव व सावळदबारा विभागांतर्गत सर्वच अंगणवाड्या चालविल्या जातात. अंगणवाडीमध्ये येणारी मुले ही आर्थिक दुर्बल घटकातील, बिगारी काम करणारे, हातावरचे पोट असणा र्या शेतमजूर कुटुंबांतील आहेत. शासनाकडून येणारा पोषण आहार मुलांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या बंदमुळे किशोरी मुली, गरोदर स्त्रिया, लहान मुलांचा पोषण आहार बंद आहे. अंगणवाडी कर्मचारी या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून या सेविका आणि मदतनीस मानधन वाढीसाठी संघर्ष करत आहेत.
सरकारी कर्मचा-यांचा दर्जा देण्याची त्यांची प्रम ख मागणी आहे. यामध्ये बहुतांश अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या विधवा आणि परित्यक्ता आहेत. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच असते, महागाई आकाशाला भिडली आहे आणि तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा त्यांना हाकावा लागतो, बिन पगारी फुल्ल अधिकारी अशी
आवस्था यांची झाली असून यांना पगार बाढ होणे गरजेचे असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे. तर कार्यालयाकडे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना सतत वाहतूक खर्चही त्यांना स्वतःच करावा लागतो. त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. तर कार्यकत्यांना २६ हजार रुपये आणि मदतनीस यांना १८ हजार रुपये मानधन वाढ करावी म्हणून बेमुदत बंद पुकारला आहे आणि वाढ झाल्याशिवाय माधार घेतली जाणार नसल्याचे समजते. मंत्री, आमदार, खासदार यांचे भत्ते, मानधन, सेवानिवृती बेतन कोणतेही आंदोलन न करता वाढ करण्यात आली आहे पण संसार चालविण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी यांना मोठी कसरत करावी लागत आहे यामुळे मानधन आणि सेवानिवृत्ती वेतन मिळणे आवश्यक आहे.
दिं ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा निघणार असल्याचे समजते.
0 9 4 2 3 3
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *