राहेर:-पातूर सरपंचपदी पंढरी गड दे यांनी विजय मिळवला तालुक्यातील मळसूर ग्रामपंचायचे सरपंच शिवाजी देवकते यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त होते.त्यासाठी दी २६ डिसेंबर रोजी रिक्त पदासाठी सदस्यांचे मतदान झाले.मळसूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. ११ सदस्य संख्यापैकी पंढरी गड दे यांना ६ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार वैशाली अनिल काळे यांना ५ मते मिळाली..मतांच्या संखेवरून पंढरी गड दे यांनी वैशाली अनिल काळे याचा प्रराभव करून सरपंच पदी विजय मिळवला यावेळी उपसरपंच कांताबाई कंकाळ, सदस्य गुणाजी सोनोने,शिवाजी देवकते,ताईबाई कंकाळ,सुनिता पवार,व पंढरी गडदे अशा सहा मताने यांनी विजय मिळवला.यावेळी मळसूर ग्रामपंचायतचे सर्व ११ सदस्य निवडणूक विशेष सभेला उपस्थित होते.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार चव्हाण होते तर निवडणूक पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत वी.अधिकारी मुसळे तलाठी घाटोळ उपस्थित होते. यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
Users Today : 7