उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळ देऊन अर्धवट असलेल्या मांजरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४२ कोटी रुपयांच्या पेय जल योजना

Khozmaster
1 Min Read

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळ देऊन अर्धवट असलेल्या मांजरी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ४२ कोटी रुपयांच्या पेय जल योजना, मांजरी येथील रेल्वेचा ३५ कोटी रुपयांचा रेल्वेचा अपूर्ण ब्रिज व सर्व्हिस रोड तसेच मुळा-मुठा नदीवर २५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुलाच्या कामाची पाहणी केली. या कामांचा आढावा घेतला.

मांजरीची पेय जल योजना महानगरपालिकेकडे त्वरित हस्तांतरित करावी, शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देऊन रेल्वे उड्डाणपूलाचे सर्विस रोड चे काम त्वरित चालू करण्यात यावे, व उड्डाणपुला वरील एक लेन सुरू झाली असून दुसऱ्या लेन साठी २५ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी दादांकडे केली आहे. यावेळी अजितदादांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही कामे त्वरित मार्गी लावण्यात यावीत असे आदेश दिले.

यावेळी पुणे महानगर पालकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिवन प्राधिकरणाचे मुख्यअभियंता राणे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागेचे मुख्यअभियंता अतुल चव्हाण, हडपसर विभागाचे पोलीस उपायुक्त डी राजा व महाराष्ट्र शासनाचे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *