अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

Khozmaster
1 Min Read

अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते भाऊ कदम आणि आमदार सुभाषबाबू यांच्या सह केले. सोलापूरच्या वैभवाला साजेसे संमेलन व्हावे ही सर्व सोलापूरकरांची भावना आहे. यानुषंगाने, संमेलनासाठी निधी व अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही, याबाबत यापूर्वीच आश्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांच्या मदतीने १०० वे विभागीय मराठी नाट्य संमेलन यशस्वी आणि भव्यदिव्य करु असे याप्रसंगी आश्वस्त केले. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील याप्रसंगी दिली. यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, विश्वनाथ आव्हाड, प्रशांत बडवे, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर, मोहन डांगरे उपस्थित होते.

Ramesh Chavhan
0 9 4 2 3 2
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *