आकुर्डी : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास (PMRDA) प्राधिकरण आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल महिवाल सो.यांचे समवेत मतदार संघातील विविध कामांच्या संदर्भात बैठक घेतली.
यामध्ये भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील पुणे महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण हद्दीतील विविध रस्ते करणे,
भोर तालुक्यातील चेलाडी ते नसरापूर रस्त्याचे १० मीटर रुंदीकरण व कॉंक्रिटीकरण करणे,
मुळशी तालुक्यातील भुगाव व भूकूम पाणी पुरवठा योजना आढावा व ड्रेनेज लाईन टाकणे.
भोर व मुळशी तालुक्यातील घनकचरा व्यवस्थापन करणे.
मुळशी तालुक्यातील भुगाव बाह्यवळण रस्त्याचे काम करणे.
मुळशी तालुक्यातील सुस-म्हाळुंगे येथील विविध सोसायटीतील जोडरस्ते करणे, ड्रेनेज लाईन टाकणे व स्ट्रीट लाईट बसविणे, सोलर लाईट बसविणे.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील आरंभ व सॉकेट बेसील या दोन सोसायट्यांच्या रस्त्यांचे काम करणे.
भोर वेल्हे व मुळशी तालुक्यातील पंतप्रधान आवास योजना नवीन डी.पी.आर.संदर्भात प्राधान्याने नवीन मंजुरी मिळणेबाबत व जुन्या मंजुरीचे थकीत अनुदान मिळावे.
जुनी बांधकामे माफक दरामध्ये नियमित करणे इ.विषयांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात झाली असून आयुक्त तथा कार्यकारी अधिकारी श्री.राहुल महिवाल यांनी या कामांना PMRDA कडून निधी उपलब्ध देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला PMRDA चे संबधीत अधिकारी यांच्यासह मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, मा.जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, मुळशी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निकिताताई सणस, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे मा.अध्यक्ष राहुल जाधव, प्रसाद खाणेकर, राहुल शेडगे, सचिन आंग्रे, सचिन जाधव, दिलीप हुलावळे, तानाजी हुलावळे आदी मंडळी उपस्थित होते.
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास (PMRDA) प्राधिकरण आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल महिवाल सो.यांचे समवेत मतदार संघातील विविध कामांच्या संदर्भात बैठक घेतली.
0
9
4
6
8
7
Users Today : 37
Leave a comment