नागपूर ता. २७ महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे महिलांना शिवणयंत्र वाटप केले जाते. वैयक्तिकरित्या अल्प आय गटातील गरीब-गरजू, विधवा, परित्यक्ता / घटस्फोटित महिलांनी व महिला बचत गटांनी शिवणयंत्रासाठी अर्ज केला नसेल तर आज अर्ज करावा असे आवाहन मनपाच्या समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
मनपा समाज विकास विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वैयक्तिकरित्या अल्प आय गटातील गरीब-गरजू, विधवा, परित्यक्ता/घटस्फोटित महिलांना तसेच सामुहिकरित्या महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून अटी व शर्तीच्या अधिन राहून शिवणयंत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त महिलांना DBT तत्वावर शिवणयंत्र वाटप करण्यात येत आहे. याकरिता महिलांनी अर्ज सदर करायचा आहे. इच्छुक महिलांनी मनपा मुख्यालय समाज विकास विभाग किंवा झोन कार्यालय येथे अर्ज करायचा आहे.
आवश्य़क कागदपत्रे/ अटी व शर्ती
– बी.पी.एल. प्रमाणपत्र किंवा पिवळी शिधापत्रिका किंवा प्राधान्य क्रम असलेली शिधापत्रिका सादर करने आवश्यक आहे.
– अर्जदार महिलेचे आधार कार्ड आवश्यक आहे.
– अर्जदार महिलेचे वय १८ ते ५५ वर्ष इतके आवश्यक आहे.
– (जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.)
– अर्जदार महिलेचे स्वतःच्या नावाची बँक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.
– उत्पन्न प्रमाणपत्र. (उत्पन्न प्रमाणपत्र रु. १ लक्ष व त्यापेक्षा कमी असने आवश्यक राहील.)
– दोन पासपोर्ट फोटो.
– प्रतिज्ञापत्र (याआधी कुठल्याही शासकीय शिवणयंत्र योजनेचा लाभ घेतला नसल्याचे व कोणत्याही शासकीय/ निमशासकीय सेवेत नोकरी करत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर देणे आवश्यक राहील.)
– नागपूर शहरात रहिवासी असल्याचे रहिवासी प्रमाणपत्र जोडने आवश्यक आहे.
– शासकीय, निमशासकीय किंवा इतर शिवणयंत्राचे प्रशिक्षण देणाऱ्या नोंदणी कृत संस्थेकडून शिवणयंत्राचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.बचत गट असल्यास
– महिला बचत गट DAY-NULM पोर्टलवर नोंदणीकृत असावे. एका महिला बचत गटास एकदा शिवणयंत्राचा लाभ दिल्यानंतर दुसऱ्यांदा लाभ मिळणार नाही. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापूवीचा गट नोंदणीकृत असने आवश्यक आहे.
– गटातील सदस्य विधवा, परित्यक्ता, एकल महिला असल्यास शिवणयंत्र देण्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल, नसल्यास गटातील साधारण महिला सदस्यास सुध्दा शिवणयंत्र देता येईल. तर याकरिता ज्या गटातील महिला सदस्य यांना लाभ द्यावयाचा आहे, त्यांना योजनेचा लाभ देण्याचा गटाचा ठराव आवश्यक आहे.
– महिला बचत गटातील एक सदस्यास शिवणयंत्र देण्यात येईल.